top of page

विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात की घातपात?; धक्कादायक खुलासा

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या गाडीचा अपघात झाला की घातपात याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. अशातच मेटे यांच्या गाडीचा ३ ऑगस्टला बीडहून पुण्याकडे जात असताना शिक्रापूरजवळ दोन गाड्यांनी पाठलाग केला असल्याचा धक्कादायक खुलासा बीड येथील पदाधिकारी अण्णासाहेब माळकर यांनी केला आहे.

ree

३ ऑगस्टला बीडहून पुण्याला जात होते त्यावेळीदेखील शिक्रापूर जवळ दोन गाड्यांनी मेटे यांच्या गाडीचा पाठलाग केला होता. तसेच या गाडीने आमच्या गाडीला कट मारण्याचादेखील प्रयत्न केला होता. या घटनेवेळी आपण स्वतः त्यांच्यासोबत होता. आयशर गाडी आपला वारंवार पाठलाग करत असल्याचे आपण मेटेंना सांगितल्याचेही ते म्हणाले. त्यावेळी संबंधित गाडीचा चालक नशेत असेल त्यामुळे तो वारंवार पाठलाग करत असेल असे मेटे साहेब म्हणाले होते. त्यामुळे १४ तारखेला पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातदेखील पाठलाग करणारी गाडी असेल तर, नक्कीच हा घातपातच असण्याची शक्यता असून, असे असल्यास आम्ही शांत बसणार नाही, असे माळकर यांनी स्पष्ट केले.


 
 
 

Comments


bottom of page