top of page

विराट कोहलीचा नवा विक्रम; टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा

शारजा : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने १३ धावा करून टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. आतापर्यंत हा विक्रम चार खेळाडूंच्या नावावर आहे. ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, शोएब मलिक आणि डेविड वॉर्नरच्या नावावर टी २० क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करण्याचा विक्रम आहे. यापूर्वी विराट कोहली आयपीएलमध्ये ६ हजारपेक्षा जास्त धावा करणारा एकमेक खेळाडू ठरला आहे.

ree

३१४ टी-२० सामन्यांमध्ये पाच शतकं आणि ७४ अर्धशतकं झळकावत कोहलीने ही कामगिरी केली. आहेत. ३१४ टी-२० सामन्यांमध्ये कोहलीने भारतासाठी ९० आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी २०२ सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ३१५९ धावा तर आयपीएलमध्ये ६ हजारांहून अधिक धावा आहेत. विराट कोहलीनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर ९,३४८ धावा आहेत. तर सुरेश रैनाच्या नावावर ८,६३२ धावा आहेत.

टी २० स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

ख्रिस गेल- १४,२६१ धावा

किरोन पोलार्ड- ११,१७४ धावा

शोएब मलिक- १०,८०८ धावा

विराट कोहली- १०,०३८ धावा

डेविड वॉर्नर- १०,०१७ धावा


 
 
 

Comments


bottom of page