top of page

पाहा VIDEO: भर लग्नातच नवरदेवाची नवऱ्यामुलीसह कुटुंबाने केली धुलाई

एकविसावं शतक असो वा.... लग्न म्हटलं की हुंडा आलाच. अजून काही हुंड्याची प्रथा बंद होण्याचे नाव घेत नाही. अनेक ठिकाणी प्रत्यक्षात पैसे नाही मात्र सोनं किंवा वस्तू रुपी हुंडा घेतला जातो. याच हुंड्यापायी नवरदेवाला नवरीसह कुटुंबाने चांगलीच अद्दल घडवली. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये ही धक्कादायक गोष्ट घडली आहे.


मुलीकडच्या घरच्यांनी नवऱ्या मुलाला सुमारे 3 लाख रुपये आणि 1 लाख रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी दिली होती. पण एवढ्याने नवदेवाचे समाधान झाले नाही. नवरदेवानं लग्नावेळी नवरी मुलीकडच्या घरच्यांकडे आणखी काही रक्कमेची मागणी केली. ही रक्कम दिली नाही तर लग्न मोडण्याची धमकी दिली. त्यानंतर नवरीच्या चिडलेल्या नातेवाईकांनी लग्नमंडपातच नवरा मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांना चांगलाच चोप दिला. या घटनेचा विडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.



 
 
 

Comments


bottom of page