top of page

Video: अंगावर काटा आणणारं वांद्रे-वरळी सी लिंकवरील अपघाताचे CCTV फुटेज आले समोर...

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वांद्रे वरळी सी-लिंकवर भीषण अपघात झाला होता. नुकताच या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. एका पक्षाचा जीव वाचवण्यासाठी कारमधून उतरलेल्या दोघांना एका टॅक्सीने जोरदार धडक दिली. टक्कर एवढी जोरदार होती त्यामुळे ते दोघेही हवेत फेकेल गेले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईच्या वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत अमर मनीष जरीवाला यांचा जागीच मृत्यू झाला. सध्या वरळी पोलिसांनी टॅक्सीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर अमर यांचा चालक श्याम सुंदर कामत हेही या अपघातात जखमी झाले असून, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अमर प्राणी-पक्षांबद्दल अत्यंत संवेदनशील होता, असे सांगितले जात आहे. ते अनेकदा पक्षी आणि प्राण्यांना मदत करत असे. त्यांच्या गाडीखाली पक्षी आला असता, त्यावेळी त्यांनी त्यांचा चालक श्याम सुंदर कामत याला गाडी थांबवण्यास सांगितले. त्यांच्यासोबत गाडीचा चालकही त्या पक्ष्याच्या मदतीसाठी खाली उतरला होता तेव्हाच हा अपघात झाला.


Comments


bottom of page