top of page

जिल्हाधिकाऱ्यांनी युवकाचा मोबाईल फोडला अन् थेट ...; व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कोरोनामुळे काही शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशा वेळी काही नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करताना दिसतात. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाईही केली जात आहे. पण काही वेळा प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांकडून आपल्या अधिकारांचा गैरवापर केला जातो आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. छत्तीसगढमध्ये नुकताच एक असा प्रकार समोर आला. आई-वडिलांसाठी मेडिकल स्टोअरमधून औषधं आणायला गेलेल्या युवकाला प्रिस्क्रिप्शन दाखवूनही छत्तीसगडच्या सुरजापूरचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी विनाकारण मारहाण केली. तसेच त्या युवकाचा मोबाईलही फोडला. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ree

सुरजपूर जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी रणवीर शर्मा स्वत: शनिवारी दुपारी काय स्थिती आहे याची पाहणी करायला गेले होते. त्यावेळी रस्त्यावरुन जात असलेल्या एका युवकाला त्यांनी थांबवलं. त्या युवकाने प्रिस्क्रिप्शन दाखवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्याकडील मोबाईल घेतला आणि रस्त्यावर आपटून फोडला. त्यानंतर त्यांनी त्या युवकाच्या थेट कानाखाली लगावली. एवढ्यावरही ते थांबले नाहीत तर पोलिसांना बोलावून त्या युवकाला मारायचे आदेश दिले. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजणांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.




 
 
 

Comments


bottom of page