top of page

पार्थ पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर करत सुजय विखे-पाटील म्हणाले…

राजकारणापलीकडची मैत्री जपण्यात महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे. नेत्यांचे राजकारणापलीकडच्या मैत्रीचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन अनेक नेते एकमेकांशी मित्रत्वाचे नातं ठेवून असतात. अशाच एका मैत्रीचं उदाहरण पाहायला मिळालं ते म्हणजे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं.

ree

अहमदनगरचे खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांची काल औरंगाबाद विमानतळावर भेट झाली. सुजय विखे आणि पार्थ पवारांनी एकाच विमानाने औरंगाबाद ते मुंबई असा प्रवासही केला. या प्रवासादरम्यान सुजय विखे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये सध्याची राजकीय घडामोडींवर ओझरती चर्चा झाली. बाकी इतरही अनेक महत्त्वांच्या विषयांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

प्रवासानंतर सुजय विखे पाटील पाटील यांनी पार्थ पवार यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ‘मैत्रीला सीमांचं बंधन नसतं’, असं म्हणत त्यांनी तो फोटो पोस्ट केला. या फोटोवर हजारो जणांनी लाईक्सचा वर्षाव केला तर कमेंट्समधून आपली मतं मांडली. काही कमेंट्स या दोघांची मैत्री अधोरेकित करणाऱ्या होत्या, तर काही कमेंट दोघांच्याही फिरकी घेणाऱ्या होत्या.






 
 
 

Comments


bottom of page