top of page

विजयपूरजवळ भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

Updated: Nov 29, 2021

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस आणि फॉर्च्युनर गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. रविवारी विजयपूर पासून पुढे 14 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला.

ree

या अपघातात नांदणीचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह इतर तीन जणांचा मृत्यू झाला असून त्या तीन जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये एक जण वाहन चालक असून हा राजूर मधील असल्याचे समजते. तर इतर दोघे तेरामैल येथील असल्याची चर्चा होती.

कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील बसवकल्याणच्या जवळपास हा अपघात झाला. मृत चिदानंद सुरवसे (वय ४७) यांची फॉर्च्युनर गाडी एम एच १३ सी एस ३३३० ही कर्नाटक राज्यातील एसटी क्रमांक के ए २२ एफ २१९८ ला धडकली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला.



घटनेची माहिती मिळताच चिदानंद सुरवसे यांचे कुटुंबीय ताबडतोब विजयपूर कडे रवाना झाले आहेत. चिदानंद सुरवसे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक होते.


 
 
 

Comments


bottom of page