top of page

VIDEO : दीपक चहरनं मैदानातच गर्लफ्रेंडला केलं प्रपोज; कोण आहे ‘ती’?

चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज दीपक चहरने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर आपल्या गर्लफ्रेंडला प्रेक्षकांसमोरच प्रपोज केले. सोशल मीडियावर दीपक आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पण, ही तरुणी नक्की कोण, या बद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे.

ree

दीपक चहरच्या गर्लफ्रेंडचे नाव जया भारद्वाज आहे. ती अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दीपक चहरने खुलेपणाने चाहत्यांमध्ये आपले प्रेम व्यक्त केले.

पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर बक्षीस वितरण संमारभाच्या आधी दीपक स्टँड्समध्ये गेला, आणि त्याने प्रेक्षकांसमोर जया भारद्वाज हिला प्रपोज केले. दीपकची ही गोष्ट पाहून त्याची गर्लफ्रेंडली खूश झाली आणि तिने दीपकला होकार दिला. दीपकने प्रपोज करतानाचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.


 
 
 

Comments


bottom of page