top of page

Video: नवरदेव नाही तर चक्क नवरी घोडीवरून वराच्या घरी...

अनेकजण सोशल मीडियावर काहींना काही शेअर करतात. त्यातील काही व्हिडिओ थोड्याच वेळात व्हायरल होतात. असाच लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव नाही तर चक्क नवरी घोडीवरून नवरदेवाच्या घरी पोहोचली आणि त्यानंतर जबरदस्त डान्स करते. हा व्हिडिओ बिहारमधील गया येथील आहे.

ree

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर आणि अविस्मरणीय क्षण असतो. प्रत्येकाला आपलं लग्न खूप खास बनवायचं असतं. जेणेकरून तो त्याच्या लग्नाचा दिवस लक्षात ठेवून आनंदी राहू शकेल. त्यामुळे ते काहीतरी वेगळे करतात की बाकी लोक बघतच बसतात.

बिहारमधील गया शहरातील एक लग्न चर्चेचा विषय बनलं आहे. यामध्ये चक्क नवरी आपल्या नवरदेवाला घेण्यासाठी घोडीवर बसून येते. ही नवरी एक इअर होस्टेस असून तिचं नाव अनुष्पा गुहा. तिचं लग्न पश्चिम बंगालच्या कोलकत्ताला राहणाऱ्या जीत मुखर्जीसोबत झालं. हे लग्न भव्य बनवण्यासाठी खूप तयारी केली गेली पण नवरीने जे केलं त्याची कोणी कल्पनाही केली नसेल.


 
 
 

Comments


bottom of page