top of page

Video: ‘पुष्पा’ चित्रपटाला आवाज देणाऱ्या श्रेयस तळपदेचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावरील डान्स पाहिलात का ?

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाची जादू भारतातच नाही तर विदेशातही पोहचली आहे. या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. या गाण्यावर सर्वजण व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. अभिनेता संदीप पाठकलाही हा मोह आवरता आला नाही. त्याने श्रेयस तळपदे सोबत 'श्रीवल्ली' या गाण्यावर डान्स केला. संदीपने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून सध्या हा व्हिडीओ चर्चेत आहे.

संदीपने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे. ‘मी सध्या कोकणात श्रेयस तळपदेसोबत ‘आपडी थापडी’ चित्रपटाचे शुटींग करतोय. पुष्पा चित्रपटात त्याने अल्लू अर्जुनला जो आवाज दिला आहे तो कमाल आहे. ती फिल्म हिदींत हीट होण्यामागे श्रेयसचं खूप मोठं Contribution आहे. तो सेटवर असताना पुष्पाच्या गाण्यावर रील करायचा मोह कुणाला नाही होणार, मलासुध्दा झाला..’ असे कॅप्शन संदीपने व्हिडीओ दिला आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.


Comments


bottom of page