top of page

Video : Russia-Ukraine war : किव्ह विमानतळावर मोठा स्फोट, इमारतींचं प्रचंड नुकसान

संपूर्ण जगाचं लक्ष रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाकडे लागले आहे. रशिया- युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अनेक देश मध्यस्ती करत आहे. रशियाच्या सैनिकानी युक्रेनची राजधानी किव्हमध्ये ताबा घेतला आहे. याचदरम्यान, किव्ह विमनातळावर मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामुळं आसपासच्या इमारतींना मोठं नुकसान झालंय. मात्र, कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दमित्रो कुलेबा यांनी यासंदर्भात एक फोटो ट्विट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, किव्ह आमचे वैभवशाली, शांत शहर आहे. रशियन भूदलाच्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांमधून दुसर्‍या रात्री बचावलं आहे. एक क्षेपणास्त्र किव्हमधील निवासी अपार्टमेंटला धडकलं.

 
 
 

Comments


bottom of page