top of page

Video : तिसऱ्या कसोटी दरम्यान सुरक्षारक्षकांनी धक्के मारुन 'या' फलंदाजाला काढलं मैदानाबाहेर

भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असणाऱ्या तिसऱ्या कसोटीमधील तिसऱ्या दिवसअखेर भारताने चांगली कामगिरी करत सामन्यातील रंगत टिकवून ठेवली आहे. मात्र या सामन्यादरम्यान सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या फलंदाजाला सुरक्षारक्षकांनी धक्के मारत आणि बळजबरीने मैदानाबाहेर काढल्याची घटना काल (शुक्रवारी) घडली. या घटनेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

ree

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली फलंदाजीला येणं अपेक्षित असतानाच भारतीय संघाचा एक इंग्लीश चाहता हेल्मेट घालून, बॅट घेऊन विशेष म्हणजे तोंडाला मास्क लावून ६९ नंबरच्या जर्सीसहीत फलंदाजीला आला होता. विशेष म्हणजे या चाहत्याने अशाप्रकारे यापूर्वीही मैदानामध्ये घुसखोरी केली होती. या चाहत्याचं नाव जारवो ६९ असं आहे. रोहित बाद झाल्यानंतर विराटऐवजी इतर कोणीतरी मैदानात शिरल्याचं समजल्यानंतर सुरक्षारक्षकांनी मैदानामध्ये धाव घेतली आणि त्याला पकडून बाहेर काढलं.



 
 
 

Comments


bottom of page