top of page

Video: लहान मुलीवर पाच कुत्र्यांनी केला हल्ला…; घटना सीसीटीव्हीत कैद!

भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस सर्वत्र वाढताना दिसत आहे. याचा त्रास वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलीवर पाच भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. मुलीला अनेक ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना भोपाळ येथील आहे.

सदर व्हिडिओ भोपाळच्या बागसेवानिया येथील अंजली विहार फेज-१ कॉलनीचा आहे. येथे दामोह येथील रहिवासी असलेले एक कुटुंब बांधकाम सुरू असलेल्या घरात मजुरीचे काम करते. शनिवारी सायंकाळी घरापासून काही अंतरावर मजुराची मुलगी एकटीच खेळत होती. तेवढ्यात पाच कुत्र्यांनी मुलीला घेरले आणि तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तसेच शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. स्थानिक नागरिकाने दगड मारून कुत्र्यांना करून हुसकावून लावले. तोपर्यंत कुत्र्यांनी मुलीला रक्तबंबाळ केले होते. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले.



 
 
 

Comments


bottom of page