top of page

मोफत लसीकरणासाठी केंद्र सरकारनं दिली ७४ कोटी लसींची ऑर्डर!

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण केले जाईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता केंद्र सरकारने मोफत लसीकरणाच्या तयारीला सुरुवात केली असून लसीच्या तब्बल ७४ कोटी डोसची ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे.

ree

यामध्ये कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि बायोलॉजिकल ई या तीन प्रकारच्या डोसचा समावेश आहे. निती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी यासंदर्भात आज दुपारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

केंद्र सरकारने कोविशिल्डचे २५ कोटी डोस, कोवॅक्सिनचे १९ कोटी डोस तर बायोलॉजिकल ई च्या ३० कोटी डोसची मागणी नोंदवली आहे. संबंधित उत्पादकांकडून या डोसचा पुरवठा तातडीने सुरू करण्यात येणार असून डिसेंबरपर्यंत हे सर्व डोस मिळणार आहेत. यातील बायोलॉजिकल ई चे डोस सप्टेंबरपर्यंत मिळतील. केंद्र सरकारने आधीच सिरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेकला ३० टक्के रक्कम अदा केली आहे, अशी माहिती देखील डॉ. व्ही. के. पॉल यांनी यावेळी दिली.


 
 
 

Comments


bottom of page