top of page

आरोग्य कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा; एकाच वेळी दिले लसीचे सहा डोस

एका २३ वर्षीय तरुणीला एकाच वेळी लसीचे सहा डोस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लसीचे सहा डोस देण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर रुग्णालयात एकच धावपळ उडाली होती. त्यानंतर सदर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात तरुणीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. सीएनएनच्या दिलेल्या वृत्तानुसार, तरुणीला सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला..ही घटना मसा ( इटली ) येथील नोआ रुग्णालयात घडली.

ree

रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी तरुणीला लसीचा डोस देण्यात आला. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्याने चुकून लसीची संपूर्ण बाटली रिकामी करत तरुणीला डोस दिला. या बाटलीत एकूण लसीचे सहा डोस होते. आरोग्य कर्मचाऱ्याला पाच सिरिंज मोकळ्या दिसल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. यानंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आलं. तरुणीला २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. ही तरुणी रुग्णालयातील मानसोपचार विभागात इंटर्न म्हणून काम करते. दरम्यान याप्रकरणी चौकशी आदेश देण्यात आले असून प्रवक्त्यांनी ही मानवी चूक असून जाणुनबुजून करण्यात आलं नसल्याचं म्हटलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page