top of page

लसीकरण प्रमाणपत्र सोशल मिडियावर शेअर करु नका, कारण…

देशभरात कोरोनाने थैमान घातले असून लॉकडाउन आणि निर्बंधांमुळे ऑनलाइन व्यवहारांमध्ये वाढ झालीय. त्याच बरोबर सायबर गुन्हेगारीही वाढली आहे. देशातील नागरिकांनी सरकारकडूनही वेळोवेळी सूचना आणि इशारे देण्यात येतात. सरकारने सोशल नेटवर्किंगसंदर्भातील सूचना देण्यासाठी सुरु केलेल्या "सायबर दोस्त" या ट्विटर हॅण्डलवरुन लसीकरण प्रमाणपत्र सोशल नेटवर्किंगवर पोस्ट न करण्याचा इशारा दिलाय.

ree

सरकारने कोरोना लसीकरणानंतर देण्यात येणारं प्रमाणपत्र ऑनलाइन माध्यमांवर, सोशल नेटवर्किंगवर पोस्ट न करण्याचं आवाहन केलं आहे. या प्रमाणपत्रावर लस घेणाऱ्या व्यक्तीची बरीच खासगी माहिती असते. यात नाव, वय यासारख्या माहितीचा समावेश असतो. या माहितीच्या आधारे सायबर गुन्हेगार फसवणूक करु शकतात. हे प्रमाणपत्र भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान लस घेतल्याचा पुरावा म्हणून कमी येऊ शकतं. कोवीन आणि आरोग्य सेतूवरुन हे प्रमाणपत्र डाऊनलोड करता येतं.


 
 
 

Comments


bottom of page