top of page

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस

देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना केंद्र सरकारे आज महत्वाचा निर्णय घेत मोठा दिलासा दिला आहे. आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस दिली जाणार असून १ मे पासून हे लसीकरण सुरू होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय लस उत्पादकांना ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे.

ree

दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी श्वसनयंत्रे, प्राणवायू आणि औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला होता. . तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. यानंतर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लस दिल्या जात आहेत. स्पुटनिक व्हीला सुद्धा आपात्कालीन मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लसीकरण मोहीमेला येत्या दिवसात वेग येणार असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर खासगी आणि सरकारी औषधनिर्मिती क्षेत्रांनी पूर्ण क्षमतेने लसउत्पादन करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.

देशात कोरोनावरील लसीकरणासाठी सरकारी केंद्र आणि खासगी रुग्णालयामध्ये लस घेता येणार आहे. सरकारी केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे. तर खासगी रुग्णालयात एका डोससाठी २५० रुपये आकारले जात आहेत.

 
 
 

Comments


bottom of page