top of page

१८ वर्षांवरील लसीकरण: २४ एप्रिलपासून करा नोंदणी, जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया...

१८ वर्षांवरील सर्वांसाठी येत्या १ मे पासून हे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. यासाठी २४ एप्रिलपासूनच नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आधीप्रमाणेच कोविन अँपवर ही नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करण्याची प्रक्रिया आधीप्रमाणेच असेल, असं केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. याआधी सुरक्षा कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्यासोबतच सुरुवातीला ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केलं होतं. आता १ मेपासून देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.

ree

नोंदणी प्रक्रिया...

  • cowin.gov.in संकेतस्थळावर जा आणि तुमचा मोबाईल क्रमांक टाका

  • मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या जागेत भरून Verify वर क्लिक करा

  • ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर व्हॅक्सिनसाठीच्या नोंदणीचं पेज उघडेल.

  • तुमची माहिती भरा आणि Register वर क्लिक करा

  • तुम्हाला मोबाईलवर नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईल.

  • नोंदणी झाल्यावर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दाखवले जातील.

  • या पेजवर लसीकरणासाठीची अपॉइंटमेंट निवडा.

  • एका मोबाईल क्रमांकावर एकूण ४ लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. नोंदणी करताना सर्व सदस्यांची माहिती भरणं आवश्यक असेल.


आरोग्य सेतू मोबाईल अँपच्या माध्यमातून देखील तुम्हाला नोंदणी करता येऊ शकेल. यासाठी अँपवर स्वतंत्र लिंक देण्यात आली असून तिथे नोंदणीसाठी तुम्हाला तुमचं नाव, वय, लिंग अशी माहिती भरून नोंदणी करता येऊ शकेल.



 
 
 

Comments


bottom of page