top of page

धक्कादायक ! ज्येष्ठ नागरिकाला पहिला डोस ‘कोव्हॅक्सिन’चा तर दुसरा ‘कोव्हिशिल्ड’चा

देशभरात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असताना महाराष्ट्रामध्ये लसीकरणासंदर्भातील एक मोठा बेजबाबदारपणा उघडकीस आळा आहे. जालना जिल्ह्यामध्ये एका ७२ वर्षीय व्यक्तीला पहिला डोस ‘कोव्हॅक्सिन’चा देण्यात आला तर दुसरा डोस ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दुसऱ्या डोसनंतर त्या व्यक्तीला त्रास झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

ree

जालना जिल्ह्यातील खांडवी गावात राहणाऱ्या ७२ वर्षीय दत्तात्रय वाघमारे यांना २२ मार्च रोजी परतूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ‘कोव्हॅक्सिन’चा डोस देण्यात आला होता. त्यानंतर ३० एप्रिलला लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेले असता त्यांना सृष्टी गावातील आरोग्यकेंद्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा डोस देण्यात आला.


दुसरा डोस घेतल्यानंतर दत्तात्रय यांना ताप आला होता आणि त्यांची त्वचा कोरडी पडली होती. लसीचा साईड इफेक्ट जाणवू लागल्यानंतर दत्तात्रय यांना त्यांचा मुलगा दिंगबरने परतूर येथील आरोग्य केंद्रामध्ये नेलं. तिथे त्यांना काही औषध देण्यात आली. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी लसीकरणासंदर्भातील माहिती असणारी कागदपत्रं दुसऱ्या दिवशी तपासली असता दत्तात्रय यांना दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्यात आल्याचं उघड झालं. दरम्यान, या प्रकऱणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं औरंगाबाद विभागाचे आरोग्य उपनिर्देशक स्वप्निल लाले यांनी सांगितलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page