top of page

वृंदावन राबोडी भाजप मंडळाचा स्तुत्य उपक्रम

ठाणे : सध्या देशभरात लसीकरण मोहीम सुरु असून ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. लसीकरणासाठी सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन वृंदावन राबोडी भाजप मंडळातर्फे बुधवार, दि. १४ एप्रिल रोजी ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून त्यांना ग्लोबल हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्रावर नेऊन परत आणण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी जवळपास ५०० नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून लसीकरण केले.

यावेळी भाजपा ठाणे जिल्हा शहर राबोडी वृंदावन मंडळ दिव्याग सेलचे अध्यक्ष.अमित देसाई, सरचिटणीस मिलिंद साटम, महिला मोर्चाच्या चिटणीस किशोरी गुप्ते आदी उपस्थित होते.

 
 
 

Comments


bottom of page