top of page

आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाही घेता येणार लस...

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असून देशभरात लसीकरण मोहीम सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज लसीकरणाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना नोंदणीशिवाय लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे.

ree

ऑनलाइन स्लॉट बुकिंग केल्यानंतरही काहीजण लस घेण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या दिवशी गैरहजर राहतात. त्यामुळं लस वाया जाण्याचीही शक्यता असते. तसेच ग्रामीण भागातील लोकांमध्ये ऑनलाईन नोंदणी विषयी पुरेशी माहिती नसल्यामुळं नोंदणी करण्यासाठी अडचणी येतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना जागेवर नोंदणी आणि लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.


मात्र, ही सुविधा केवळ सरकारी कोविड लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. ही सुविधा खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार नाही. खासगी केंद्रांमध्ये लसीकरणासाठी अद्याप ऑनलाइन नोंदणीद्वारेच स्लॉट बुक करावे लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते-ते संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर अवलंबून आहे की, त्यांना हा निर्णय लागू करायचा आहे की नाही. ऑनलाईन नोंदणीची सुविधा राबविण्यासाठी आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांना जिल्हा प्रशासनाबरोबर काम करण्याचे आदेश दिले आहेत.

 
 
 

Comments


bottom of page