top of page

शेतकरी उत्पादक गट व कंपन्यांनी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्राम परिवर्तन प्रकल्पात सहभाग नोंदवा

वर्धा :- राज्य शासनाने बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प योजना सुरु केली आहे. प्रकल्पात सहभाग नोंदविण्यासाठी महाराष्ट्रातील समुदाय आधारित संस्था आणि संस्थात्मक खरेदीदारांकडून शेतमाल, शेळया आणि परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पासाठी, तसेच मुल्यसाखळी विकासाचे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प आणि बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. यासाठी 31 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांनी केले आहे.


प्रकल्पात सहभाग नोंदविण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन, महाराष्ट्र राज्य जिवनोन्नती अभियानांर्तगत स्थापित प्रभाग संघ महिला आर्थिक विकास महामंडळाव्दारे स्थापित लोकसंचालित साधन केंद्र यांचा समावेश असणार आहे. प्राप्त होणा-या प्रस्तावातील स्पर्धात्मक व उत्कृष्ट प्रस्तावांना 60 टक्के अनुदान देण्यात येईल. अर्जाचा नमुना www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


स्मार्ट प्रकल्पातर्गत शेतीपिके, शेळया व परस बागेतील कुक्कुटपालन यांच्या उत्पादक भागीदारी उपप्रकल्प किंवा बाजार संपर्कवाढ उपप्रकल्पासाठी अर्ज करण्याकरीता प्रथम स्मार्ट प्रकल्पाच्या www.smart-mh.org या संकेतस्थळावर समुदाय आधारित संस्था व खरेदीदार यांचे कडून अर्ज मागविण्याकरीता आयकॉन क्लिक करुन जाहिरातीचे वाचन करावे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. यांनतर मराठी किंवा इंग्रजी भाषेची निवड करावी. समुदाय आधारित संस्था म्हणुन लॉगिन करुन खरेदीदाराने खरेदीदार म्हणुन लॉगीन करुन क्लिक करावी. प्रथमता नोंदणी करा या बटनावर क्लिक करुन आवश्यक माहिती भरुन लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करावा. अर्जदार नोंदणीची माहिती भरतांना नोंदणी प्रकार या बटणावर क्लिक केल्यानंतर ड्रॉपडाऊन मध्ये पिकमुल्य साखळी, शेळी मुल्यसाखळी व परसबागेतील कुक्कुटपालन यापैकी एक पर्याय निवाडावा लॉगिन आयडी व पासवर्ड हा दोन्ही भाषेतच करावे.


मराठी भाषेतील माहिती भरण्यासाठी युनिकोड फॉन्टचा वापर करावा. लॉगिन केल्यानंतर समुदाय आधारित संस्थेस उत्पादक भागीदारी उपप्रकल्प आणि बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी निवडीच्या निकषानुसार योग्य पर्याय निवडावा. पर्यायानुसार अर्जाचे प्रपत्र दिसतील, ते भरावे. अर्ज सादर केल्यानंतर माहितीमध्ये बदल करता येणार नाही. अपलोड करावयाची कागदपत्रे 5 एम.बी. पर्यंत असावीत व ती पीडीएफ फाईल स्वरुपात तयार ठेवावीत अर्ज पोष्टाने किंवा ई-मेल व्दारे सादर करु नये. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील गट तंज्ञज्ञान व्यवस्थापक यांचे संपर्क साधावा. अर्ज भरतांना काही अडचणी असल्यास प्रकल्पाच्या 022 25656577 किवा 25656578या मदत केंद्राच्या दूरध्वनी क्रमांकावर शासकिय सुटीचे दिवस वगळून संपर्क साधावा, असे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन8 यंत्रणा यांनी कळविले आहे.

 
 
 

Comments


bottom of page