top of page

युक्रेनसाठी अमेरिकेने केली मोठ्या मदतीची घोषणा

८०० मिलियन डॉलर्सचे नवे पॅकेज जाहीर; शस्त्रासह आर्थिक मदतीची घोषणा

ree

रशिया-युक्रेन यांच्यात २४ फेब्रुवारीपासून युध्द सुरु आहे. युद्धसमाप्तीसाठी चर्चेच्या फेऱ्याही सुरू आहेत. आतापर्यंत रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील ६९१ नागरिकांचा मृत्यू झाला असून, १,१४३ जण जखमी झाले असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. तसेच सुमारे ३० लाख नागरिकांनी युक्रेनमधून स्थलांतर केले आह़े. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काही दिवसांपूर्वीच युक्रेनला हवी ती मदत करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार बायडेन यांनी युक्रेनसाठी मोठ्या मदतीची घोषणा केलीय.यामध्ये त्यांनी आर्थिक मदतीबरोबरच लष्करी म्हणजेच शस्त्रास्त्रही युक्रेनला दिली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. युक्रेनसाठी आम्ही ८०० मिलियन अमेरिकन डॉलर्सची संरक्षण विषयक आर्थिक मदत युक्रेनला देणार आहोत, असं बायडेन म्हणालेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी अमेरिकन संसदेमध्ये युक्रेनमध्ये कोणती मदत पाठवली जाणार आहे याची सविस्तर माहिती दिली.

अमेरिकेकडून युक्रेनला देण्यात येणाऱ्या मदतीच्या पॅकेजमध्ये काय काय असणार आहे याबद्दल खुलासा करताना बायडेन यांनी, अमेरिकेकडून ८०० अ‍ॅण्टी-एअरक्राफ्ट सिस्टीम्स, ९००० अ‍ॅण्टी-आर्मोर (मिसाइल) सिस्टीम्स, ७००० छोट्या आकाराची शस्त्र ज्यामध्ये लहान बंदुकी आणि ग्रेनेड लॉन्चर्स या गोष्टी युक्रेनला पुरवल्या जाणार आहे. युक्रेनला लष्करी ड्रोन्सचीही मदत अमेरिकेकडून केली जाणार आहे. तसेच शस्त्र पुरवण्याबरोबरच अमेरिका युक्रेनला आर्थिक मदतही करणार असल्याचं बायडेन म्हणालेत..




 
 
 

Comments


bottom of page