top of page

उत्तर प्रदेशमधील पाच शहरात लॉकडाऊन लावण्याचा न्यायालयाचा आदेश

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे लखनऊ, वाराणसी, कानपूर नगर, गोरखपूर व अलाहाबाद (प्रयागराज) या शहरांमध्ये आठवडाभरासाठी लॉकडाउन लागू करावा, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिला होता. पण उत्तर प्रदेश सरकारने सध्या तरी लॉकडाउन अशक्य असल्याचं म्हटलं आहे.

ree

उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून राज्यातील विलगीकरण केंद्रांची अवस्था आणि रुग्णांवरील उपचारांची परिस्थिती याबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेवर न्या. सिद्धार्थ वर्मा व न्या. अजित कुमार या न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. मात्र, योगी आदित्यनाथ सरकारनं उच्च न्यायालयाच्या आदेशावर अंमलबजावणी करण्यास नकार दिला आहे.

न्यायालयाच्या या आदेशांमुळे लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर परिणाम होईल. जनतेच्या जीवनाचं आणि उपजीविकेचं संरक्षण करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे, त्यामुळे न्यायालयाच्या या आदेशांवर अंमलबजावणी होऊ शकत नाही, असं म्हणत योगी सरकार शहरांत 'संपूर्ण लॉकडाऊन' लावण्यास नकार दिलाय. .


 
 
 

Comments


bottom of page