top of page

UP Election : योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलेल्या संपत्तीत रिव्हॉल्व्हर, रायफल आणि …

योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्जादरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात योगी आदित्यनाथ यांनी १ कोटी ५४ लाख ९४ हजार ०५४ रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये रोख रक्कम, सहा बँक खात्यांची शिल्लक आणि बचत यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नावावर एकही घर, जमीन आणि गाडी नाही. पण त्यांच्याकडे १२ हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल फोन, एक लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि ८० हजार रुपये किमतीची रायफल असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे.

ree

२०१७ मध्ये योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली होती, त्यावेळी त्यांनी आपली संपत्ती ९५.९८ लाख रुपये असल्याचे जाहीर केले होते. गोरखपूरचे पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात गोरखपूर शहर मतदारसंघात ३ मार्च रोजी मतदान होणार आहे.



 
 
 

Comments


bottom of page