top of page

…तर 'ही' मोठी शहरं समुद्रात बुडतील; संयुक्त राष्ट्राचा इशारा

जगभरातील हवामान बदलाबाबत चिंता व्यक्त करत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी अनेक देशांना इशारा दिला आहे. समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीचा मुंबई आणि न्यूयॉर्कसारख्या शहरांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जगभरातील देशांना हवामान बदलाच्या संकटाशी सामना करण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील, असंही गुटेरेस यावेळी सांगितले.

ree

यूएन सुरक्षा परिषदेत ‘समुद्राच्या पातळीत वाढ – आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी उपाय’ यावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, गुटेरेस म्हणाले की, समुद्राच्या बातळीत वाढ होणं हे चिंतेचं कारण आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे कैरो, लागोस, मापुटो, बँकॉक, ढाका, जकार्ता, मुंबई, शांघाय, कोपनहेगन, लंडन, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, ब्युनोस आयर्स आणि सॅंटियागोसारख्या शहरांना मोठा धोका आहे. यावर वेळीच उपायोजना कराव्या लागतील असंही गुटेरेस यांनी सांगितलं .


Comments


bottom of page