top of page

तानाजी सावंत यांची शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क पदावरून हकालपट्टी

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क पदावरुन शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा संपर्क पदावर अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्यपत्र दैनिक ‘सामना’मध्ये याबाबत वृत्त देण्यात आलं आहे.

ree

दरम्यान यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं अर्जुन खोतकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आलीय. अशी माहिती एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलीय. त्याचबरोबर विजय नाहटा आणि विजय चौगुले यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं माहिती पत्रकात देण्यात आलीय.


 
 
 

Comments


bottom of page