top of page

ट्रकचा अपघात; कोल्ड्रिंक्स पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड

औरंगाबाद : दुचाकी चालकाला वाचवण्याच्या नादात कोल्ड्रिंक्सने भरलेल्या ट्रकला मोठा अपघात झाला. अपघातानंतर कोल्ड्रिंक्स पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. औरंगाबाद जिल्ह्यातील धुळे-सोलापूर हायवेवर हा अपघात झाला होता. रस्त्यावरुन जाणाऱ्या अनेक नागरिकांनी कोल्ड्रिंक्सच्या शेकडो बाटल्या पळवल्या. हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

अहमदाबाद (गुजरात) वरुन कोल्ड्रिंक्सने भरलेला हा ट्रक औरंगाबादला येत होता. अपघातानंतर अनेक नागरिकांनी कोल्ड्रिंक्सचे बॉक्सच्या बॉक्स पळवले. कोल्ड्रिंक्सचे बॉक्स पळवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 
 
 

Comments


bottom of page