top of page

१, २ नाही तर चक्क ३५ किमी रेल्वेचा उलट्या दिशेने प्रवास...

दिल्ली ते उत्तराखंड दरम्यान धावणाऱ्या एका रेल्वेने १, २ किमी नाही तर चक्क ३५ किमी उलट्या दिशेने प्रवास केल्याची घटना घडली आहे.

ree

बुधवारी ही रेल्वे दिल्लीहुन उत्तराखंडच्या टनकपूर जिल्ह्यापर्यंत जाणार होती. मात्र अचानक आलेल्या एका तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे उलट दिशेने धावू लागली. अखेर राजधानी दिल्लीपासून ३३० किमी दूर खातिमा येथे ही रेल्वे थांबवण्यात आल्याने एक मोठा अपघात टळला.

पूर्णगिरी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चालकाला ट्रॅकवर प्राणी दिसताच दुर्घटना टाळण्यासाठी ब्रेक दाबला. त्यानंतर चालकाचा इंजिनावरील ताबा सुटला आणि रेल्वे उलट दिशेने धावू लागली. यावेळी रेल्वेचा वेगदेखील सामान्य होता. रेल्वे खातिमा येथे थांबवण्यात आल्यानंतर सर्व प्रवाशांना बसने तानकपूर येथे रवाना करण्यात आलं. दरम्यान तांत्रिक बिघाडाचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

 
 
 

Comments


bottom of page