top of page

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून माजी नगराध्यक्षांच्या दुकानावर धाड...

औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे यांच्या सोन्याच्या दुकानावर एका तोतयाने 'सीबीआय' अधिकारी असल्याचे भासवून 'स्पेशल २६' या चित्रपटाप्रमाणे धाड टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र या तोतया अधिकाऱ्यांच्या हालचालीवर संशय आल्याने लोळगे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चौकशी केली असता हा 'तोतया सीबीआय अधिकारी ' असल्याचे समोर आले.

ree

विठ्ठल हरगुडे असे तोतया सीबीआय अधिकाऱ्यांचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे.

हारगुडे यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच कारमध्ये बसलेला त्याचा साथीदार घाटे(रा. पुणे) हा कार घेऊन फरार झाला. पोलीसांनी हारगुडे याच्याकडे केलेल्या चौकशीत या प्रकरणाचा मास्टरमाइंड पैठण येथील भाजपाचा ओबीसी मोर्चाचा माजी पदाधिकारी रघुनाथ ईच्छैय्या असल्याचे समोर आले आहे.


 
 
 

Comments


bottom of page