top of page

...तब्बल ४१ वर्षांनी भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये मिळालं पदक

सुरुवातीला ३-१ने पिछाडीवर असताना जबरदस्त पुनरागमन करत भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला पराभूत करुन ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. या विजयासह भारतीय संघाने कांस्य पदकावर नाव कोरले. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. १९८० मध्ये १ गोलच्या फरकाने भारतीय संघाने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्यानंतर तब्बल ४१ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालं आहे.

ree

आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले. अत्यंत रोमहर्षक सामन्यामध्ये भारताने अगदी शेवटच्या सेकंदाला विजयावर शिक्कामोर्तब केलं.

सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत होता. याच प्रयत्नात असतानाच अगदी सामन्यातील शेवटचे सहा सेकंद शिल्लक होते तेव्हा जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणाऱ्या गोलपकीपरने म्हणजेच श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला.


 
 
 

Comments


bottom of page