top of page

तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी महाराष्ट्रातील 'या' व्यक्तीची निवड

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टच्या नव्या बोर्डाची स्थापना केली आहे. यामध्ये एकूण २८ सदस्यांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून या सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचीदेखील ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

राज्य सरकारने बुधवारी तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्टच्या नव्या बोर्डची स्थापना केली. यामध्ये २८ सदस्य असून चार पदसिद्ध सदस्यांचा समावेश आहे. देशभरातून २४ जणांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून मिलिंद नार्वेकरांचाही समावेश आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संवाद साधून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची जबाबदारीदेखील आहे.


Comments


bottom of page