top of page

उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांचा राजीनामा

देहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. रावत यांनी चार महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रावत यांचा राजीनामा महत्त्वाचा मानला जात आहे.

ree

तीरथसिंह रावत १० मार्च रोजी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांची निवड होणे आवश्यक होती. मात्र लोकप्रतिनिधी अधिनियमानुसार विधानसभेचा कार्यकाल एका वर्षाच्या आत संपणार असल्याने रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेता येत नाही. उत्तराखंड विधानसभेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपत आहे.

रावत यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमवेत रात्री उशिरा राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला. दरम्यान आज (शनिवारी) दुपारी देहरादून येथील पक्षाच्या मुख्यालयात भाजपने नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी आमदारांची बैठक बोलावली आहे.


 
 
 

Comments


bottom of page