top of page

हृदयद्रावक : आई अन् पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाने फरफटत नेलं

आईच्या डोळ्यासमोर पोटच्या मुलाला वाघाने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. वाघाने केलेल्या हल्ल्यात एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

ree

राजेंद्र अर्जुन कमादी असे मृताचे नाव आहे. ते हल्दी ( ता. ब्रह्मपुरी) गावातील रहिवासी असून ते मजुरीचे काम करत होते. घराभोवती कुंपण करण्यासाठी लाकूड गोळा करण्यासाठी ते आपल्या आई आणि पत्नीसह जवळच्या जंगलात गेला होता. तेव्हा झुडपात लपलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यावेळी त्यांची आई आणि पत्नीदेखील समोरच होती. वाघाने त्यांना फरफटत नेले. आई आणि पत्नीने आरडाओरड केल्यानंतर वाघाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र या हल्ल्यात राजेंद्र याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच, स्थानिक रहिवासी आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


 
 
 

Comments


bottom of page