top of page

“Thank You मोदी सरकार”… राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरची सर्वत्र चर्चा

चंद्रपूर महानगरपालिकेच्या इमारतीसमोर व शहरात सर्वत्र चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने “थँक्यू मोदी सरकार”… असे उपहासात्मक डिजिटल बॅनर सर्वत्र लावण्यात आले आहेत. या बॅनर मधून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला असून सध्या या बॅनर्सने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ree

पेट्रोलची शंभरी, खड्ड्यात गेलेला शेअर बाजार, बेरोजगारी व महागाईचा उल्लेख या बॅनर मध्ये करण्यात आलेला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता असून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या सर्व अनधिकृत होर्डिंग्सवर मनपातर्फे कारवाई करण्यास सुरूवात झालेली आहे. काही ठिकाणी उंचावर असलेल्या तसेच मजबूत ढाचा असलेले जाहिरात फलक काढण्यास एजन्सीची नियुक्ती करणार असल्याचे महापौर राखी कंचर्लावार यांनी सांगितले.

 
 
 

Comments


bottom of page