top of page

आणखी एका रुग्णालयास आग; चार रुग्णांचा मृत्यू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट होत चालली असतानाच दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनाची मालिका सुरूच आहे. नाशिक, विरार नंतर आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात बुधवारी पहाटे आग लागून चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ree

जुन्या मुंबई-पुणे रोडवरील शिमला पार्क परिसरात असलेल्या प्राईम क्रिटीकेअर या रुग्णालयात बुधवारी पहाटे आग लागली . पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी रुग्णालयात आयसीयू वार्डात ६ रुग्ण, तर इतर वार्डात १४ रुग्ण उपचार घेत होते. माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णावाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आयसीयूमधील रुग्णांना तातडीने बिलाल रुग्णालयात हलविण्यात आलं. तर इतर रुग्णांना सुटी देण्यात आली. या घटनेत चार रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.


 
 
 

Comments


bottom of page