top of page

ठाण्यातील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला आग

ठाणे : ठाणे पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन रोडवरील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील दुकानांना भीषण आग लागली आहे. सकाळी 8 च्या सुमारास या मार्केटमधील एका दुकानाला आग लागली. त्यानंतर काही क्षणातच या आगीने रौद्ररुप धारणं केले.

ree

या आगीत इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून राख झाल्या आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे.

या दुकानातील बहुतांश व्यापारी हे सकाळी दुकान उघडण्यास आले असता त्यांना ही आग लागल्याची दिसले. त्यानंतर त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन करुन याबाबतची संपूर्ण माहितीही देण्यात आली. यानंतर तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घटनास्थळी धाव घेतली. जवळपास एका तासाने नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. या आगीत दोन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. तर इतर दुकानांचे किरकोळ नुकसान झाले.


 
 
 

Comments


bottom of page