top of page

टि.ई.टी. परिक्षेच्या तारखेत बदल करण्याची मागणी

पुणे : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या वतीने घेतली जाणारी टी.ई.टी. परिक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे .याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुर्वपरिक्षा असल्याने राज्यातील दोन्ही परिक्षा देणार्या हजारो उमेदवारांना हा निर्णय गैरसौयीचे ठरणार आहे. एकाच दिवशी दोन्ही परिक्षा असल्यामुळे टी.ई.टी वेळापञकात बदल करण्याची मागणी पुणे येथील दत्ताञय फडतरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


जानेवारी २०२० मध्ये महा टि.ई.टी परिक्षा पार पडली .यानंतर ,जानेवारी २०२१ या परिक्षेचे नियोजन करण्यात आले होते. परंतु ,कोरोना प्रार्दुभावामुळे राज्यशासनाने ही परिक्षा घेण्यासाठी परवानगी नाकारली होती . दिड वर्षोपासुन परिक्षा लांबणीवर पडल्या होत्या. अखेर १० ऑक्टोबर २०२१ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहेत. परंतु, काही महिन्यांपुर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुर्वपरिक्षा याच दिवशी होणार असल्याचे घोषित केले आहे राज्यातुन सात ते दहा लाखापर्यंत उमेदवार ह्या परिक्षा देत असतात. शिक्षण विभागाने याचा याबाबतीत कोणताही विचार न करता ,त्याच दिवशी टीईटी परिक्षा होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. लाखो उमेदवार परिक्षा देण्याचे नियोजन करत असतात. परंतु,एकाच वेळी दोन्ही परिक्षा देणे गैरसौयीचे ठरणार आहे. राज्यशासनाने परिक्षेची तारिख बदलण्याची मागणी उमेदवारांकडून होत आहे.

ree

केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुर्वपरिक्षा असल्याने टि.ई.टी परिक्षेच्या तारखेत बदल करण्यात यावा,अशा सुचना राज्यशासनाच्या शिक्षण विभागाला करण्यात याव्यात. .टी.ई.टी परिक्षेचे नवीन वेळापञक तातडीने प्रसिद्ध करण्याची मागणी फडतरे यांनी निवेदनाद्वारे राज्यशासनाकडे केली आहे.


 
 
 

Comments


bottom of page