top of page

... दहशतवाद्यांचा पाठलाग... चार दिवसांनी जवान आणि दहशतवादी आले आमने-सामने ...

जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधातील १० ऑक्टोबरच्या कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत एक अधिकारी आणि चार जवान शहीद झाले होते. त्यानंतर चार दिवसांनी जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली. पूंछ-राजौरीच्या जंगलात दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक सुरु झाली. यामुळे जम्मू-पूंछ-राजौरी हायवे बंद करण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांपासून या दहशतवाद्यांचा लष्कराकडून पाठलाग करण्यात येत होता. मात्र उंच डोंगर आणि जंगलामुळे ते जवानांना चकमा देत होते. पण अखेर गुरुवारी जवान आणि दहशवतादी आमने-सामने आले. दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईदरम्यान झालेल्या गोळीबारात एक अधिकारी आणि जवान गंभीर जखमी झाले आहेत. अद्यापही चकमक सुरु आहे


Comments


bottom of page