top of page

बायकोला २६ देश फिरवून आणणाऱ्या चहावाले आजोबांचे निधन

Updated: Nov 21, 2021

चहा विक्री करुन पैसे जमवून आपल्या पत्नीसोबत २६ देशांमध्ये भटकंती करणारे आजोबा काळाच्या पडद्याआड गेले. केरळमधील कोच्ची शहरामध्ये असलेल्या ‘श्री बालाजी कॉफी हाऊस’चे मालक के. आर. विजयन यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. केरळमधील ट्रॅव्हलिंग कपल म्हणून विजयन आणि त्यांची पत्नी मोहना यांना ओळखलं जातं. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पर्यटन प्रेमामुळे ते चर्चेत आले होते.

ree

छोटं चहाचं दुकान चालवून त्यामधून जमा खर्च आणि दैनंदिन गरजा भावून उरलेले पैसे साठवत या जोडप्याने जगातील अनेक देशांमध्ये पर्यटनानिमित्त भटकंती केलीय. चहाच्या टपरीच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईच्या जोरावर त्यांनी आपली भटकंतीची हौस पूर्ण केली. या जोडप्याने जगभर प्रवास केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दखल घेतली होती. महिंद्रा यांनी या जोडप्यासाठी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा प्रायोजित केला होता.

ree

विजयन आणि मोहना यांचं लग्न ४० वर्षांपूर्वी झालेलं. त्यांनी एकत्र २६ देशांची भटकंती केलीय. रशियाचा दौरा (२१ ते २८ ऑक्टोबर २०२१) हा या जोडप्याचा एकत्र असा शेवटचा दौरा ठरला. हा रशियाचा दौरा त्यांचा कोरोना लॉकडाउननंतरचा पहिलाच दौरा होता २००७ पासून हे दोघे भटकंती करत होते. वर्षभर कष्ट करुन पैसे

साठवायचे आणि नंतर त्यामधून एखाद्या देशात हे दोघे फिरून यायचे. आपल्या पहिल्याच परदेश दौऱ्यासाठी ते इस्रायलला गेले होते. त्यानंतर ते ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रिया, इजिप्त, युएई, अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये जाऊन आलेत. ते त्यांच्या या छंदामुळे सेलिब्रिटी झाले होते. त्यांच्या दुकानात त्यांच्या भटकंती विषयाच्या लेखांच्या फ्रेम्सबरोबरच जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या वेळा दाखवणारी घड्याळं खास आकर्षण होतं.

ree

आर्थिक नियोजनाबद्दल बोलताना आम्ही दिवसाला ३०० रुपये बाजूला काढून ठेवयचो. वर्षभरातून एक, दोनदा भटकण्यासाठी हे साठलेले पैसे आणि काही कर्ज काढून घेतलेले पैसे वापरुन आम्ही भटकंती केली असं विजयन यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं


 
 
 

Comments


bottom of page