top of page

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

मुंबई : जून महिन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी भारताच्या टीमची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने खेळाडूंची निवड केली आहे. या अंतिम सामन्यासाठी या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हा अंतिम सामना 18 ते 23 जून दरम्यान साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे.

ree

असा असेल भारतीय संघ :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव,


जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल

भारत विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 23 जून, साउथ्मपटन


इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.


 
 
 

Comments


bottom of page