top of page

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने आज भारतीय संघाची घोषणा केली. या संघामध्ये नवीन चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला असून सूर्यकुमार यादवला संघात संधी देण्यात आली आहे. या मालिकेतील तीन सामने २३, २६ आणि २८ मार्च या दिवशी होणार आहेत.

ree

टी-20 मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पुण्यात खेळवण्यात येणार असून पहिला सामना 23 मार्चला, दुसरा सामना 26 मार्चला तर 28 मार्चला तिसरा सामना होणार आहे.


भारताच्या या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे तर उपकर्णधारपद हे रोहित शर्माकडे असणार आहे. चौथ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमारने अर्धशतक साजरे करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. मात्र विजय हजारे स्पर्धेत धावांची बरसात करणाऱ्या पृथ्वी शॉला वगळण्यात आले आहे. तर, प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. युवा सलामीवीर शुभमन गिलला यावेळी संघात स्थान देण्यात आले आहे.



असा आहे भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

 
 
 

Comments


bottom of page