top of page

उद्धव ठाकरे आणि दरेकरांमध्ये बंद दाराआड चर्चा

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकरांमध्ये जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

ree

दरम्यान या भेटीनंतर प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना या चर्चा जाहीरपणे सांगू शकत नाही असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, ‘प्रामुख्याने महाराष्ट्रात आलेली पूरस्थिती आणि अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. त्याचबरोबर पूरग्रस्तांना मुंबईकरांकडून मदत जावी यासाठी मुंबईतील सहकारी संस्थांच्या वतीने दीड कोटींचा निधी मुख्यमंत्री सहायत्ता निधीला आम्ही दिला आहे.

यावेळी त्यांना बंद दाराआड झालेल्या चर्चेसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी विरोधी पक्षनेता असल्याने मुख्यमंत्री भेटल्यावर स्वावाभिकपणे इतरही राजकीय गोष्टींवर चर्चा होणार. त्याच्यामुळे या चर्चा जाहीरपणे सांगण्यासारख्या नाहीत”.


 
 
 

Comments


bottom of page