top of page

ऑक्सिजन, औषध पुरवठ्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून टास्क फोर्सची स्थापना

देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. याची दखल घेत सुप्रीम कोर्टाने शनिवारी ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. टास्क फोर्स केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाशी सल्ला मसलत करण्यासाठी स्वतंत्र असेल. ही समिती आपली नियमावली तयार करण्यासही स्वतंत्र असेल असंही सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशात नमूद केलं आहे.

ree

डॉ. भबतोष विश्वास, डॉ. देवेंद्र सिंह राणा, डॉ. देवी प्रसाद शेट्टी, डॉ. गगनदीप कांग, डॉ. जेवी पीटर, डॉ. नरेश त्रेहन, डॉ. राहुल पंडित, डॉ. सौमित्र रावत, डॉ. शिव कुमार सरीन, डॉ. जरीर एफ उदवाडिया यांच्यासह आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव, नॅशनल टॉक्स फोर्स संयोजक आदींचा टास्क फोर्समध्ये समावेश आहे.


कर्नाटक हायकोर्टानं ५ मे रोजी दिलेल्या आदेशाला आव्हान देत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या आदेशात कर्नाटक राज्याला प्रतिदिन १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आला होते. या आदेशानंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची याचिका फेटाळत कर्नाटक हायकोर्टाचा आदेश कायम ठेवला आहे.


 
 
 

Comments


bottom of page