top of page

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण स्फोट

तारापूर औद्योगिक वसाहतीतील जखारिया लिमिटेड या कंपनी मध्ये झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला तर ५ कामगार जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ree

सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला असून तीन ते चार किलोमीटर परिसरात स्फोटाचा मोठा आवाज ऐकू गेला आहे. त्यानंतर कापडाचे उत्पादन करणाऱ्या या कंपनीमध्ये मोठी आग लागली. आगीची माहिती मिळताच तारापूर अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांननी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे.जखमी झालेल्या ५ कामगारांवर बोईसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


 
 
 

Comments


bottom of page