top of page

कार २०० फूट खोल दरीत कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू

कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात वाशीम जिल्ह्यातील ३ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात शनिवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी हा अपघात झाला. ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे आणि कृष्णा राठोड अशी मृतांची नावे असून या अपघातात रोहन गाडे, प्रवीण सरकटे आणि रोशन चव्हाण हे जखमी झाले आहेत. जखमींना माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

ree

वाशिम जिल्ह्यातील सहा तरुण पर्यटक फिरण्यासाठी ताम्हीणी घाटात आले होते, त्यांची गाडी ताम्हिणी घाटात आली असता एक वळणावर कार कठड्यावरुन सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांसह साळुंखे रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. यावेळी त्यांनी जखमी अवस्थेतील ३ पर्यटकांना शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले.



 
 
 

Comments


bottom of page