top of page

३०० तालिबानी ठार

काबुल : तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर आता स्थानिकांनी तालिबान्यांविरोधात एकत्र येण्यास सुरुवात केलीय. नॉर्दन अलायन्सने तालिबान्यांविरोधात सुरु केलेल्या लढाईमध्ये स्थानिकांनीही सहभाग घेण्यास सुरुवात केली असून सध्या अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह आणि त्यांची फौज पंजशीरचं खोरं आणि कापीसामधून तालिबान्यांविरोधात लढत आहे. रिपब्लिक टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार सध्या पंजशीर आणि कापीसामध्ये तालिबानी आणि नॉर्दन अलायन्सच्या फौजांमध्ये जोरदार संघर्ष सुरु असून दोन्ही बाजूने तुफान गोळीबार केला जात आहे. अंदाराब या ठिकाणी झालेल्या संघर्षात नॉर्दन अलायन्सने ३०० तालिबान्यांना ठार केल्याचंही रिपब्लिकने म्हटलं आहे.


Comments


bottom of page