top of page

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील "या" संघाचे आव्हान संपुष्टात

शारजाह: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजने बांगलादेशचा ३ धावांनी पराभव केला. ग्रुप फेरीतील बांगलादेशचा सलग तिसरा पराभव ठरला. या पराभवामुळे बांगलादेशचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले असून स्पर्धेतून बाहेर पडणारा तो पहिला संघ ठरला आहे.

ree

बांगलादेशने नाणेफेकी जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ७ बाद १४२ धावा केल्या होत्या. १४२ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला ५ बाद १३९ धावा करता आल्या. श्रीलंका आणि इंग्लंड यांच्याविरुद्धच्या सामन्यातही बांगलादेश पराभूत झाला होता.


 
 
 

Comments


bottom of page