top of page

समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार?; धनंजय मुंडे याचं सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडेंसंदर्भातील एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात कोणी तक्रार दाखल करुन आक्षेप घेतला तर सामाजिक न्याय मंत्रालयाच्या मार्फत वानखेडेंची चौकशी केली जाईल असं मुंडे म्हणाले आहेत.शनिवारी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी हे वक्तव्य केलं. यामुळे वानखेडेंच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हं दिसत आहेत.

ree

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केलेत. त्यामध्येच त्यांनी समीर वानखेडे हे मुस्लीम असून त्यांनी मुस्लीम असल्याचं लपवत चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये नोकरी मिळवल्याचा आरोपही केलाय. यावरुनच मुंडे यांनी हा इशारा दिलाय.


 
 
 

Comments


bottom of page