top of page

'कबूल है......यह क्या किया तुने... ?' म्हणत मलिकांनी मध्यरात्री टाकला "फोटो बॉम्ब"

समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार ?


गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. मलिक यांनी आज मध्यरात्री पुन्हा एकदा वानखेडेवर निशाणा साधला आहे.मलिक यांनी ट्वीटरवर एक फोटो पोस्ट करत "कबूल है, कबूल है, कबूल है...यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ? ' असा सवाल वानखेडेंना विचारला आहे.

ree

नवाब मलिक यांनी वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा केला होता. त्यातच आता नवाब मालिकांनी वानखेडेंचा नवीन फोटो समोर आणला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि एक अन्य व्यक्ती दिसत आहे. वानखेडे यांच्या निकाहच्या वेळचा हा फोटो असल्याचे दिसत आहे. 'कबूल है, कबूल है, कबूल है...यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ?' असं म्हणत मलिक यांनी फोटोसह ट्वीट केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना उत्तर देण्याचे आदेश दिलेले असतानाच आता एनसीबीचे झोनल अधिकारी नवाब मलिक यांच्या मेहुणीने दाखल केलेल्या तक्रारीने मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मंत्री नवाब मलिक हे नुकतेच परदेशात गेले असून त्यांनी स्वतः त्यांच्या या आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती दिली होती. "मी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व आवश्यक परवानग्या घेऊन दुबईला जात आहे. मी 24 नोव्हेंबर 2021 रोजी भारतात परत येईन. सर्व सरकारी यंत्रणांनी माझ्यावर लक्ष ठेवावे आणि माझ्या हालचालींचा मागोवा घ्यावा ही विनंती" असं म्हणत त्यांनी ही माहीती दिली होती.


 
 
 

Comments


bottom of page